संजू राठोडचं 'एक नंबर, तुझी कंबर..' हे गाणं सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतय. या गाण्याचे रिल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशातच अनेक सेलिब्रिटी या गाण्याचा व्हिडिओ बनवताना पहायला मिळत आहे. अनेक मालिका, चित्रपटातील कलाकार या गाण्यावर रिल बनवताय. अशातच आता 'मन उडू उडू झालं' मालिकेतील अभिनेता अजिंक्य राऊत याने 'एक नंबर, तुझी कंबर..' या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय.