Ajit Pawar Visit Suraj Chavan Home: अजित पवारांनी केली सुरज चव्हाणच्या घराची पाहणी, म्हणाले...'कामात कोणतीही कसर होता कामा नये'

Suraj Chavan : बिग बॉस मराठी विजेता सुरज चव्हाण याच्या घराची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. यावेळी त्यांनी संबंधितांना 'कामात कोणतीही कसर होता कामा नये' अशा सुचना दिल्या आहेत.
Ajit Pawar Visit Suraj Chavan Home
Ajit Pawar Visit Suraj Chavan Homeesakal
Updated on

बिग बॉस मराठी 5 चा विजेता सुरज चव्हाण याची एक वेगळी ओळख आहे. बिग बॉसची विजेता ठरल्यानंतर सुरज चव्हाणने अजित पवारांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी 'सुरजला घर बांधून द्या' अशा सुचना दिल्या होत्या. सुरजच्या घराचं काम सध्या वेगाने सुरू आहे. दरम्यान अजितदादांनी सुरजच्या घराच्या बांधकामाची पाहणी केली आहे. तसंच यासंबंधी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com