

simulacra
esakal
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळे प्रयोग होत असतानाच आता स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी एक भन्नाट साय-फाय (Sci-Fi) म्हणजेच विज्ञानपट आणला आहे. दिग्दर्शक पंकज सावंत यांचा 'सिम्युलाक्रा' हा हाय-कांसेप्ट चित्रपट लवकरच डिजिटल पडद्यावर धडकणार आहे. श्रीकांत कदम, प्रवीन पिंगट आणि पंकज सावंत यांनी 'फिलोसिआ फिल्म्स'च्या (Philosia Films) बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली असून, येत्या १७ जुलै रोजी 'वेव्ह्ज ओटीटी'वर (Waves OTT) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच या चित्रपटाचा थरारक टीझर रिलीज करण्यात आला आहे.