अक्षय कुमार हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. अशातच आता अक्षयचा 'स्काय फोर्स' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्याला त्याचा अभिनय पाहण्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान अक्षयचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अक्षयने आपल्या चाहत्यासोबतचा अनुभव शेअर केला आहे.