
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनत असले तरी युद्धावर आधारित असणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच उत्तम दाद दिली आहे. आतापर्यंत युद्धाच्या विषयावर अनेक चित्रपट आले आणि त्याला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आता दिग्दर्शक अभिषेक अनिल कपूर आणि संदीप केळवाणी यांचा 'स्काय फोर्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.