Alka Kubal Reveals Why She First Refused Maherchi Sadi Movie Offer
esakal
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल या 90 दशकातील आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्या एका वर्षात 7 8 चित्रपट करायच्या. अलका कुबल यांनी अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली. साध्या, सरळ अभिनयातून त्यांनी स्वत:चं स्थान निर्माण केलं. परंतु त्यांचा चर्चेत असलेला सिनेमा म्हणजे, 'माहेरची साडी'. या चित्रपटाने अलका कुबल यांना ओळख दिली. अलका कुबल यांचं नाव घेतलं की, माहेरची साडीचा उल्लेख होतोच होतो.