Allu Arjun: चेहऱ्यावर ना भीती ना... हाती चहाचा कप; पत्नीसोबत भावनिक क्षण, अटकेआधीचा अल्लूचा हा व्हिडिओ पाहिलात का?

Allu Arjun and Sneha Reddy Emotional VIdeo: पुष्पा 2 च्या प्रीमियर रात्री संध्या थिएटरमध्ये एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ४ डिसेंबर रोजी मध्यरात्री प्रीमियर शोमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. आता अभिनेत्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
Allu Arjun and Sneha Reddy Emotional VIdeo
Allu Arjun and Sneha Reddy Emotional VIdeoESakal
Updated on

'पुष्पा 2: द रुल'च्या यशादरम्यान अल्लू अर्जुनबद्दल एक बातमी समोर आली. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अल्लू अर्जुनचे चाहते निराश झाले आहेत. प्रीमियरच्या दिवशी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुष्पा 2 स्टारला अटक करण्यात आली असून तिला हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. साऊथ सुपरस्टारचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन पोलिसांसोबत बातचित करताना दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com