Allu Arjun: दुबईतील संग्रहालयात अल्लू अर्जुनचा मेणाचा पुतळा; फोटोमधील खरा अल्लू अर्जुन कोणता? नेटकऱ्यांना ओळखणं झालं कठीण

Allu Arjun: दुबईतील (Dubai) मादाम तुसाद म्युझियममधील (Madame Tussauds Museum) अल्लू अर्जुनचा मेणाचा पुतळा रिव्हिल करण्यात आला.
Allu Arjun
Allu Arjunesakal
Updated on

Allu Arjun: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) चाहता वर्ग मोठा आहे. केवळ देशातच नाही तर परदेशात देखील अल्लू अर्जुनचे चाहते आहेत. नुकताच दुबईतील (Dubai) मादाम तुसाद म्युझियममधील (Madame Tussauds Museum) अल्लू अर्जुनचा मेणाचा पुतळा रिव्हिल करण्यात आला. या मेणाच्या पुतळ्याचे काही फोटो अल्लू अर्जुननं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमधील खरा अल्लू अर्जुन कोणता? हे नेटकऱ्यांना ओळखणं कठीण झालं आहे. (A wax statue of Allu Arjun in a museum in Dubai; Know which is the real Allu Arjun in the photo?)

मादाम तुसाद म्युझियमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुनचा मेणाचा पुतळा रिव्हिल करण्यात आला आहे. स्वत:चा मेणाचा पुतळा पाहून अल्लू अर्जुनला आनंद झाला, असं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं,'द बिग रिव्हिल, अल्लू अर्जुननं दुबईतील त्याचा मेणाचा पुतळा पाहिला.'

फोटोमधील खरा अल्लू अर्जुन कोणता?

मादाम तुसाद म्युझियमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आणखी एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये अल्लू अर्जुन हा त्याच्या मेणाच्या पुतळ्यासोबत उभा असलेला दिसत आहे. या फोटोमधील खरा अल्लू अर्जुन कोणता हे ओळखणं नेटकऱ्यांना कठीण झालं आहे. फोटोमधील डाव्याबाजूचा अल्लू अर्जुन खरा असून उजवीकडे त्याचा मेणाचा पूतळा आहे.

अल्लू अर्जुननं त्याचा मेणाच्या पुतळ्यासोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "There you go" अल्लू अर्जुनच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अल्लू अर्जुननं फोटोमध्ये त्याच्या पुष्पा चित्रपटातील सिग्नेचर पोज दिलेली दिसत आहे.

Allu Arjun
Allu Arjun Pushpa 2 Fees: एकही रुपया न घेता अल्लू अर्जून करणार 'पुष्पा 2'! तरीही कमावणार करोडो पण ते कसे?

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' कधी होणार रिलीज?

अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राइज या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता अल्लू अर्जुन हा त्याच्या 'पुष्पा 2' या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. त्याचा हा मोस्ट अवेटेड चित्रपट यावर्षी 15 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे.

Allu Arjun
Allu Arjun Daughter Arha : अल्लूची सहा वर्षांची लेक, दहा मिनिटांच्या रोलसाठी घेतले तब्बल...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com