
Allu Arjun's Daughter Arha Remuneration and other Details : अल्लू अर्जून बॉलीवूडच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय होताच. मात्र जेव्हा त्याचा पुष्पा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. गेल्या काही वर्षांपासून पुष्पाच्या दुसऱ्या पार्टची वाट पाहत आहेत. पुष्पा रिव्हेंज नावाचा चित्रपट हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या सोशल मीडियावर पुष्पा फेम अल्लू अर्जूनच्या लाडक्या लेकीची आरहाची चर्चा रंगताना दिसत आहे. यापूर्वी तिचा समंथा आणि श्रीवल्ली फेम रश्मिकासोबत व्हायरल झालेल्या व्हिडिओला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावर नेटकऱ्यांनी तिला दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट होत्या. सहा वर्षांच्या आरहाची लोकप्रियता मोठी आहे. इंस्टावर व्हायरल झालेल्या तिच्या फोटोंना नेटकऱ्यांची मिळणारी पसंती खास चर्चेचा विषय असतो.
Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?
ज्युनिअर एनटीआर आणि एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटानं ऑस्करपर्यत मजल मारली. आणि त्यातील नाटू नाटू गाण्याला ऑस्करही मिळालं. यानंतर ज्युनिअर एनटीआर हा त्याच्या आगामी देवरा नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. ही त्याची ३० वी फिल्म असून त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. त्यातून जान्हवी कपूर ही साऊथमध्ये डेब्यू करणार आहे.
यासगळ्यात अल्लू अर्जूनची सहा वर्षांची लेक देखील मोठ्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. तिनं त्या खास लूकसाठी घेतलेलं मानधन हा देखील बातमीचा विषय झाला आहे. दुसरीकडे एनटीआरचे चाहते देवराची गेल्या काही दिवसांपासून आतूरतेनं वाट पाहत आहेत. आपला मित्र अल्लू अर्जूनची सहा वर्षांची लाडकी आरहा त्याच्या चित्रपटात काम करणार असल्यानं एनटीआरनं देखील आनंद व्यक्त केला आहे.
देवराचे दिग्दर्शन हे कोरतला शिवा करणार असून ही ज्युनिअर एनटीआरची ड्रीम फिल्म असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी देखील त्यानं त्याच्या काही मुलाखतींमधून त्याविषयी प्रतिक्रिया दिली होती. त्यात जान्हवी आणि सैफ अली खान हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ५ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अल्लूची आरहा ही नेहमीच चर्चेत राहणारी सेलिब्रेटी किड्स आहे. अल्लूनं सहा मार्च २०११ रोजी स्नेहा रेड्डीशी लग्न केलं. त्याला दोन मुलं आहेत. मुलाचे नाव अयान असून त्याचा जन्म ३ एप्रिलचा तर मुलगी आरहाचा जन्म २१ नोव्हेंबरचा. यापूर्वी आऱहानं समंथाच्या शाकुंतलममधून डेब्यू केले होते. त्यात तिनं समंथाच्या मुलीची भूमिका केली होती. देवरासाठी चिमुरड्या आरहानं तब्बल सहा लाख रुपयांची फी घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.