
एकता कपूरच्या वेब सिरीजवर सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप होता
यावर पोलिसांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत
मध्य प्रदेशात याच मुद्द्यावर खटला दाखल सुरू आहे.
Ekta Kapoor Controversy : एकता कपूर प्रकरणात मुंबई पोलिसांनी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की एकता कपूर आणि तिच्या अल्ट बालाजी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीजमध्ये सैनिकांचा अपमान केल्याच्या आरोपांमध्ये कोणताही गुन्हा आढळला नाही. युट्यूबर विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ यांनी 2020 मध्ये दाखल केलेल्या तक्रारीत असा दावा केला होता की एका वेब सिरीजमध्ये लष्करी अधिकाऱ्याला आक्षेपार्ह कृत्यात दाखवून भारतीय सैन्याच्या गणवेशाचा आणि राष्ट्रीय चिन्हाचा अपमान केला गेला.