
महाराष्ट्राची हास्यजत्रा चा नवा सिझन सुरू झाल्यानंतर आता पहिल्यांदाच ‘MHJ Unplugged’ पॉडकास्ट सिरीज येत आहे.
हास्यवीर फक्त रंगमंचावरचे विनोदच नव्हे, तर त्यांच्या विनोदापलीकडच्या आयुष्याच्या कथा प्रेक्षकांशी शेअर करतील.
गेली सात वर्षं प्रेक्षकांना हसवणाऱ्या हास्यवीरांची खरी कहाणी ऐकण्याची संधी या पॉडकास्टमधून मिळणार आहे.