AMITABH BACHCHAN 90 CRORE DEBT STORY
Esakal
AMITABH BACHCHAN FINANCIAL CRISIS AND BANKRUPTCY: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेने अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. १९७० च्या दशकामध्ये त्यांना 'अँग्री यंग मॅन' म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या अभिनयातून कोट्यवधींचं साम्राज्य निर्माण केलंय. परंतु त्यांच्या आयुष्यात असा एक काळ आला होता जेव्हा त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यांच्यावर तब्बल ९० कोटी रुपयांचं कर्ज झालं होतं. तसंच त्यावेळी त्यांचा बँक बॅलेन्स सुद्धा शून्य होता. इतकंच काय तर त्यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुद्धा करण्यात आली होती. तसंच त्यांच्यावर सुमारे ५५ कायदेशीर प्रकरणं सुद्धा सुरु होती.