Amitabh Bachchan Coolie Accident Stor
esakal
COOLIE FAME AMITABH BACHCHAN LIFE THREATENING ACCIDENT STORY: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी १९८२ हे वर्ष अत्यंत धक्कादायक ठरलं होतं. त्यांचा 'कुली' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. बंगळुरूमध्ये एक फाईट सीन सुरु होता. तेव्हा त्यांना जोरदार धक्का लागला आणि ते स्टीलच्या टेबलावर आदळले. त्यामुळे त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली.