

Bollywood News : बिग बींचा नातू अगस्त्य नंदाची मुख्य भूमिका असलेल्या इक्कीस सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. सेकंड लेफ्टनंट शहीद अरुण खेत्रपाल यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाची चर्चा काही काळापासून रंगली आहे. पण आता या ट्रेलरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.