Amitabh Bachchan
esakal
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू आहे. त्यांनी सोशल मीडियावरून आपल्या तब्येतीविषयी माहिती दिली होती. डॉक्टरांनी त्यांना काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. आता त्यांच्या प्रकृतीमुळे 'कौन बनेगा करोडपती'चं (KBC) शूटिंग थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.