AMITABH BACHCHAN HOSPITALISED
esakal
AMITABH BACHCHAN HEALTH UPDATE AND LATEST MEDICAL NEWS: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, त्यांना नेमक्या कोणत्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.