अमिताभ बच्चन पुन्हा हॉटसीटवर! 'कौन बनेगा करोडपती १८'ची तारीख अखेर जाहीर, यावेळी 'सोचना पड़ेगा'ची नवी थीम

KAUN BANEGA CROREPATI SEASON 18 PREMIERE DATE: अमिताभ बच्चन पुन्हा 'कौन बनेगा करोडपती १८'चे सूत्रसंचालन करणार आहेत. लवकरच होणाऱ्या KBC 18 मध्ये 'सोचना पड़ेगा' ही नवी थीम आणि AI युगातील तार्किक विचारांवर भर दिला जाणार आहे.
KAUN BANEGA CROREPATI

KAUN BANEGA CROREPATI

esakal

Updated on

SONY TV KAUN BANEGA CROREPATI 18 LAUNCH: टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि बहुप्रतिक्षित गेम शो 'कौन बनेगा करोडपती' आपल्या १८व्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. सोनी टीव्ही आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी या सीझनची घोषणा केली असून, 'सोचना पड़ेगा' ही या पर्वाची मुख्य संकल्पना असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com