
स्वराज्यरक्षक संभाजी या टीव्ही मालिकेत शेवट गुंडाळण्यात आल्याच्या आरोपांना उत्तर देताना खासदार अमोल कोल्हे यांनी दबावामुळे तसं करावं लागल्याचं म्हटलं होतं. आता यावर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलंय. छावा हा चित्रपट आहे तर स्वराज्यरक्षक संभाजी ही टीव्ही मालिका होती. दोन्हींचं माध्यम वेगवेगळं आहे. मालिका प्रसारीत करताना काही मर्यादा होत्या आणि त्यामुळे संभाजीराजांवर करण्यात आलेले अत्याचार दाखवता आले नाही. सामाजिक भान म्हणूनही आम्ही ते न दाखवण्याचा निर्णय घेतला होता असंही अमोल कोल्हे यांनी सांगितलं.