

AMRUTA KHANVILKAR
ESAKAL
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या अभिनयाने आणि आपल्या नृत्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं. ती मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र चांगले चित्रपट केल्यानंतरही तुमच्या सोबतचे कलाकार तुम्हाला नीट वागवतीलच असं नाही. इतके चांगले चित्रपट करूनही अमृताला एका दिग्दर्शकाने चक्क सेटवर धक्का दिलेला. नेमकं काय घडलेलं हे अमृताने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.