

AMRUTA KHANVILKAR AFFAIR
ESAKAL
AMRUTA KHANVILKAR HIMANSHU MALHOTRA DIVORCE: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रेमात पाडणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (AMRUTA KHANVILKAR) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अमृताने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली. सोबतच तिच्या नृत्यकौशल्यावरही चाहते फिदा आहेत. मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीमध्येही तिने आपला जम बसवलाय. एकीकडे तिचे चित्रपट आणि नाटक सुरू असताना दुसरीकडे तिच्या वैवाहिक आयुष्यात मात्र वादळ आलंय. अमृता आणि हिमांशू यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याचं समोर आलंय. मात्र यासगळ्यात अमृताचं नाव एका मराठी अभिनेत्यासोबत जोडलं जातंय.