आनंदी मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीचा अनोखा उपक्रम; सकाळ वृत्तपत्राच्या सहाय्याने केला ब्रेल जाहिरातीचा अनोखा प्रयोग

Star Pravah Anandi Serial : स्टार प्रवाह वाहिनीने अनोखा उपक्रम सकाळ वृत्तपत्राच्या साहाय्याने राबवला. काय आहे हा उपक्रम जाणून घेऊया.
आनंदी मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीचा अनोखा उपक्रम; सकाळ वृत्तपत्राच्या सहाय्याने केला ब्रेल जाहिरातीचा अनोखा प्रयोग
Updated on

Entertainment News : स्टार प्रवाह वाहिनीने आजवर मालिका विश्वात निरनिराळे सामाजिक, भावनिक आणि वास्तवाशी जोडलेले विषय हाताळत प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं आहे. या यशस्वी परंपरेला पुढे नेत स्टार प्रवाह वाहिनीने नुकतीच एका वेगळ्या धाटणीची मालिका भेटीला आणलीय. ही गोष्ट आहे अपघातात दृष्टी गमावलेल्या, तरीही आयुष्याकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनाने पाहणाऱ्या आनंदीची. आनंदीला डोळ्यांनी जग दिसत नसलं, तरी मनाने आणि संवेदनांनी ती संपूर्ण जग अनुभवते. आनंदीची ही गोष्ट अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com