
'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया समोर आली आहे. अभिनेता अल्लू अर्जुनवर करण्यात आलेली कारवाई योग्य असल्याचे सांगून त्यांनी तेलंगणा पोलिसांना दोषी धरण्यास नकार दिला आहे.