Is Ankita Lokhande Pregnant? Viral Post
esakal
अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ती तिच्या ब्लॉग्समधून चाहत्यांना तिच्या दैंनदिन जिवनाच्या अपडेट देत असते. तिचे ब्लॉग्स नेहमीच चर्चेत सुद्धा असतात. अशातच आता गेल्या काही दिवसापासून अंकिता लोखंडे प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगत होत्या. अशातच आता खुद्द अंकितानेच होणाऱ्या बाळाबद्दल भाष्य केलय. तिचं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केलीय. त्यानंतर तिच्या प्रेग्नेंसीबाबतच्या चर्चेला उधाण आलय.