
Ankita prabhu walawalkar share photo with Suraj Chavan's would be wife
Esakal
बिग बॉस मराठी ५चा विजेता सूरज चव्हाण हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. नुकताच त्याने सोशल मीडियावर एका मुलीसोबतचा फोटो पोस्ट केला होता. यानंतर त्याचं लग्न ठरले असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकर हिने पोस्ट केलेल्या स्टोरीमुळे यावर शिक्कामोर्तब झालंय. अंकिताने लग्नाला येणं शक्य नसल्यानं भेट घेतली असल्याचं स्टोरीत म्हटलंय.