Santosh Juvekar open up about on Chhava Movie Trolling
esakal
अभिनेता संतोष जुवेकर हा मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. काही दिवसापूर्वी 'छावा' चित्रपटात तो पहायला मिळाला होता. त्याच्या अभिनयाचं सगळीकडून कौतूक सुद्धा झालं होतं. परंतु त्याने केलेल्या काही वक्तव्यामुळे त्याला खूप ट्रोलिंगचा सुद्धा सामना करावा लागला होता. दरम्यान अशातच संतोष जुवेकरने एपीबी माझाच्या 'माझा कट्टा' या शोमध्ये त्याच्या ट्रोलिंगवर भाष्य केलंय.