
Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीजन 5 मुळे लोकप्रिय ठरलेल्या अंकिता वालावलकरचा विवाहसोहळा नुकताच थाटात पार पडला. 16 फेब्रुवारीला अंकिताने संगीतकार कुणाल भगत बरोबर लग्नगाठ बांधली. कुडाळमधील वालावल येथील लक्ष्मी नारायण मंदिरात पार पडलेल्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रटीजनी हजेरी लावली होती.