Ankita Lokhande : यमुनाबाईंच्या भूमिकेसाठी अंकिताने मानधनाला का दिला होता नकार?

रणदीप हुड्डाचा बहुचर्चित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Ankita Lokhande
Ankita Lokhandesakal

रणदीप हुड्डाचा बहुचर्चित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: या चित्रपटात रणदीपसोबत ‘बिग बॉस १७’ फेम अंकिता लोखंडेने तिच्या अप्रतिम अभिनयाने वाहव्वा मिळवली आहे. यात अंकिताने वीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे.

दरम्यान, अंकिताने या चित्रपटासाठी कोणतेही शुल्क घेतले नसल्याच्या बातम्या येत आहेत. याबाबतीत या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी ही माहिती दिली आहे. संदीप सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या चित्रपटापूर्वी मी अनेक मोठ्या चित्रपटांशी जोडला गेलो आहे. मीसुद्धा संघर्षाचे दिवस पाहिले आहेत; पण त्या वेळी माझ्यासोबत कोणी असेल, तर ती माझी मैत्रीण अंकिता लोखंडे होती.

अंकिता आणि तिची मैत्रीण कंगना रनौत यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. जेव्हा माझ्या मनात वीर सावरकरांचा विचार आला तेव्हा माझ्यासोबत काम करावंसं कोणालाच वाटलं नाही. कारण मी अनेक माध्यमांच्या चाचण्यांमधून गेलो होतो; पण जेव्हा मी अंकिता लोखंडेशी या चित्रपटाबद्दल बोललो, तेव्हा तिने मला सांगितले की मी एका अटीवर काम करेन आणि ती म्हणजे या चित्रपटासाठी मी कोणतेही शुल्क घेणार नाही.

अंकिता लोखंडेने या चित्रपटात ज्या प्रकारे यमुनाबाईंची भूमिका साकारली आहे, त्याबद्दल तिचे खूप कौतुक होत आहे. आगामी काळात अंकिता आणखी अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com