

ANKUR WADHAVE
ESAKAL
प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा त्याला काय करायचं, त्यातून कसं बाहेर पडायचं हे सुचत नाही. असंच काहीसं घडलेलं अंकुर वाढवे सोबत. ' चला हवा येऊ द्या' मधून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता अंकुर वाढवे याने वेगवेगळी पात्र साकारून आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. मात्र अशी एक वेळ होती जेव्हा त्याला त्याच्या मित्राने चक्क तू अजून जिवंत कसा असा प्रश्न विचारलेला. नेमकं काय घडलेलं?