१३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'नो एंट्री पुढे धोका आहे' या चित्रपटातील कलाकारांची धमाल आणि 'जपून जपून जा रे' या गाण्याने तर अवघ्या प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्याची मागणी प्रेक्षकांकडून केली जात होती. दरम्यान आता लवकरच सर्वांचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी याने स्वतः 'नो एंट्री पुढे धोका आहे 2 - कॉमेडी ऑफ टेरर्स' ची सोशल मीडियावर घोषणा केली आहे.