
Marathi Entertainment News : मराठीमधील आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत छावाच्या विशेष शोचं आयोजन केलं. त्याने आयोजित केलेल्या शोला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या शोला ज्येष्ठ नागरिकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींनी हजेरी लावली. मराठी भाषेचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा अभिमानास्पद वारसा जोपासण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.