

DIGHYA MARRIED SUREKHA
ESAKAL
अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री साई ताम्हणकर यांचा 'दुनियादारी' चित्रपट मराठी सिनेसृष्टीमधील कल्ट क्लासिक चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची अजूनही तरुणाईमध्ये वेगळीच क्रेझ आहे. त्याची कथा, गाणी, कलाकार सगळंच अफलातून होतं. चित्रपटाची गाणी आणि डायलॉग तर आजही प्रेक्षकांच्या तोंडावर आहेत. याच चित्रपटातलं गाजलेलं पात्र म्हणजे दिघ्या. दिघ्या कसाही असला तरी दिघ्या नीच नाहीये रे असं म्हणणारा हा दिघ्या प्रेक्षकांच्या काळजात घर करून बसला होता. आजही त्याच्यावर अनेक मीम बनतात. आता हाच दिघ्या पुन्हा चर्चेत आहे.