ANNU KAPOOR
esakal
ANNU KAPOOR ON SCIENCE VS VASTU: गेल्या चार दशकांहून अधिक काळ अभिनय, गायन, सूत्रसंचालन, रेडिओ आणि दूरदर्शनच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अन्नू कपूर हे हिंदी मनोरंजनविश्वातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व मानले जातात. 'मंडी', 'मिस्टर इंडिया', 'डर३, 'विकी डोनर', 'जॉली एलएलबी २' आणि 'ड्रीम गर्ल' सारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही लक्षात स्मरणात आहेर. आता ते २४ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'उत्तर दा पुत्तर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्या निमित्ताने त्यांनी विज्ञान, वास्तू, नशीब, कर्म आणि स्वतच्या कामाच्या पद्धतीबद्दल मनमोकळेपणे भूमिका मांडली.