'चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान' या आपल्या आगामी मालिकेतून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन पराक्रम, नेतृत्व आणि शूर वारसाची कहाणी प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या मालिकेत पृथ्वीराज चौहान राजाची राजकुमारापासून ते भारतातील एक महान योद्धा राजा बनण्याच्या प्रवासाची कहाणी उलगडणार आहे. या मालिकेत त्याची युवावस्था, त्याचा संघर्ष, त्याने मिळवलेले विजय प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.