

Anupam Kher Denies 500 Crore Net Worth, Lives on Rent
esakal
Anupam Kher: हिंदी आणि इंग्लिश चित्रपटसृष्टीत 44 वर्षांहून अधिक काळ काम करणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या एकूण संपत्तीबाबत इंटरनेटवर फिरणाऱ्या चर्चांवर सडेतोड भूमिका मांडली आहे. 'द अनफिल्टर्ड आवर' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या एकूण मालमत्तेचा आकडा 400 ते 500 कोटी रुपये असल्याचे दावे फेटाळून लावले.
संपत्तीच्या अशा खोट्या आकडेवारीमुळे मित्रांमध्ये अनेकदा थट्टा-मस्करीचा विषय बनतो, असे त्यांनी नमूद केले. या आकड्यांच्या 10 टक्केही संपत्ती आपल्याकडे नसल्याचे सांगत, कधीकधी अशा दाव्यांविरोधात खटला दाखल करावासा वाटतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.