
Entertainment News : भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि प्रेक्षक स्वत:ला सहज रिलेट करू शकतील, अशा ‘स्टार प्लस’वरील ‘अनुपमा’ या मालिकेच्या कथानकाने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील मुख्य भूमिकेत रूपाली गांगुली असून सामाजिक अपेक्षांपेक्षा स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची निवड करणाऱ्या एका महिलेच्या प्रवासाचे सुरेख चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. पारंपरिक घरात तिने केलेल्या संघर्षांपासून स्वतःचा आवाज शोधण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास आहे.