अनुराग कश्यम यांच्या 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. दरम्यान या सीरिजमध्ये नवाझुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत असून सैफ अली खान, राधिका आपटे, पंकज त्रिपाठी हे मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान या सीरिजमध्ये अजून एका पात्राने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. कुकू हे ट्रान्सजेंडरचं पात्र चाहत्यांना फार भावलं होतं. कुब्रा सैतने कुकूची भूमिका साकारली होती. दरम्यान एका मुलाखतीत कुब्रा सैतने धक्कादायक खुलासा केला आहे. 'सिक्रेड गेम्स' या वेब सीरिजमध्ये दिग्दर्शकाने दारु पाजली असल्याचं तिने सांगितलय.