
Entertainment News : बॉलिवूडमधील नावाजलेला आणि प्रथितयश दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यपची ओळख आहे. अतिशय उत्तम आणि सुपरहिट सिनेमा देणारा अनुराग सध्या बॉलिवूडवर नाराज असून तो तेथील व्यवस्थेवर सडेतोड टीका करताना दिसतोय. दोन महिन्यांपूर्वी त्याने तो बॉलिवूड कायमचं सोडणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यातच त्याने आता मुंबईला कायमचा रामराम केल्याची बातमी शेअर केली.