

APURVA NEMLEKAR
ESAKAL
आता गणरायाला निरोप द्यायची वेळ झालीये. गेले ११ दिवस गणपती बाप्पा घराघरात विराजमान होते. भक्तांची डेकोरेशन पासून नैवेद्यापर्यंत सगळ्याची धावपळ झाली. मात्र गणरायाच्या येण्याचा आनंद काहीतरी वेगळाच होता. यावर्षी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्या घरी पहिल्यांदाच गणपती बसला होता. तिचं सासरचं पहिलंच वर्ष जेव्हा त्यांनी घरी गणपती बाप्पा आणले होते. लग्नानंतर अपूर्वाची घरी गणपती आणण्याची इच्छा पूर्ण झाली. तिने दीर जाऊ आणि नवर्याच्या मदतीने सगळं केलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अपूर्वाच्या सासरेबुवांनी तिच्या घरातील वागण्याबद्दल सांगितलं आहे.