

APURVA NEMLEKAR
ESAKAL
अपूर्वा नेमळेकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. तिच्या अभिनयाचं देखील कौतुक होतं. 'बिग बॉस मराठी ४' मधून अपूर्वा खऱ्या अर्थाने सगळ्यांना समजली. ती शेवटची 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत दिसली होती. मात्र खऱ्या आयुष्यात अपूर्वाने प्रचंड खचता खाल्ल्यात. तिने आपल्या जिवलग माणसांना गमावलंय. गेली ९ वर्ष अपूर्व सिंगल म्हणून आयुष्य जगतेय. ९ वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झालेला. एका मुलाखतीत तिने त्यामागचं कारणंही सांगितलेलं.