Malaika Arora : अरबाजचे दुसऱ्या पत्‍नीसह मलायकासोबत डिनर

मलायका आणि अरबाज वेगळे होऊन बराच काळ लोटला आहे
Malaika Arora
Malaika Aroraesakal

मलायका अरोरा आणि अरबाज खान घटस्फोटानंतर आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. अरबाजने २४ डिसेंबरला मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले. मलायका अनेक दिवसांपासून अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मलायका आणि अरबाज वेगळे होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र, वेगळे झाल्यानंतरही दोघांमधील मैत्री कायम आहे.

Malaika Arora
Summer Health Tips : कैरी, चिंच, गुळाचे पन्हे उन्हाळ्यात घ्याच! आयुर्वेदाचार्याचा सल्ला

खान कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतरही मलायका अरोराने त्यांच्याशी चांगले संबंध ठेवले आहेत. तिने अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नाला हजेरी लावली नाही; पण तिच्या एक्स पतीला शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी मलायका अर्जुन कपूरसोबतच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत असते. दरम्यान, मलायकाने शुक्रवारी रात्री मुंबईतील एका रेस्‍टॉरंटमध्ये तिच्या एक्ससोबत डिनरचा आनंद लुटला.

स्‍वतः मलायका, तिची आई, अरबाज खान, त्याची दुसरी पत्नी शूरा खान, सलीम खानदेखील यावेळी होते. ही डिनर पार्टी मलायका आणि अरबाजचा मुलगा अरहानच्या ‘डंब बिर्याणी’च्या पॉडकास्ट डेब्यूबद्दल होती, असे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com