

ARBAJ SHAIKH ON NAGRAJ MANJULE
ESAKAL
'सैराट' मधून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता अरबाज शेख सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. अरबाजने काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र अनेकांचा त्याची पत्नी पंजाबी असल्याचा गैरसमज झाला. त्यावर त्याला बरंच ट्रोल करण्यात आलं. अरबाज 'सैराट' नंतर अनेक चित्रपटात दिसला. नुकताच तो नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग' या सिरीजमध्येही इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसला. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नागराज मंजुळेंमुळे आपण नवीकोरी बुक केलेली गाडी कॅन्सल केली असं त्याने सांगितलंय. नेमकं काय घडलेलं?