

BIGG BOSS MARATHI 6
ESAKAL
BIGG BOSS MARATHI 6: छोट्या पडद्यावर सुरू झालेला 'बिग बॉस मराठी ६' आता वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. घरातल्या सदस्यांची भांडणं असतील किंवा घरात खेळले जाणारे टास्क असतील, शो मधली प्रत्येक गोष्ट आता चर्चेचा विषय ठरतेय. त्यात काही दिवसांपूर्वी सागर कारंडे याचा तंबाखू खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. डीपी दादांनी हा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामुळे पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात व्यसन करायला परवानगी आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला. सोबतच घरात ड्रिंकिंग आणि स्मोकिंग चालते का असंही नेटकरी विचारताना दिसतात. आता 'बिग बॉस मराठी ६' चे क्रिएटिव्ह हेड असलेले केतन माणगावकर यांनी याबद्दल उत्तर दिलं आहे.