ARUN GOVIL ON RAMAYAN
esakal
रामानंद सागर यांच्या ८० च्या दशाकतील रामायण या मालिकेत भगवान श्रीरामांची भूमिका साकारून अभिनेता अरुण गोविल यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी त्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात असा प्रभाव टाकला की, आजही अनेक जण त्यांनी प्रभु श्रीरामाच्या भूमिकेतच पाहत असतात. दरम्यान आता नितेश तिवारी रामायणम् या सिनेमातून पुन्हा एकदा रामायणाशी जोडले गेलेत. परंतु यावेळी ते भगवान श्रीरामच्या नाही तर राजा दशरथ यांच्या भूमिकेत पहायला मिळाले. परंतु सुरुवातीला ही भूमिका साकारण्यासाठी अरुण गोविल तयार नव्हते. एका मुलाखतीत त्यांनी त्यामागचा किस्सा सांगितला.