Aryan Khan Dating Rumors with Brazilian Actress Larissa Bonesi Go Viral:
esakal
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान करिअरची सुरुवात अत्यंत ग्रँड पद्धतीने केली. परंतु तो शाहरुख सारखा अभिनय न करता एक दिग्दर्शक म्हणून स्पर्धेत उतरला आहे. त्याची 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजचं ग्रँड प्रीमियर सुद्धा करण्यात आलं. या प्रीमियरनंतर आर्यन खान बद्दल अनेक चर्चा रंगू लागल्या. डिक्टो वडिलांसारखा वागणाऱ्या आर्यनची गर्लंफ्रेंड कोण असेल? याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. दरम्यान या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात आर्यनच्या गर्लंफ्रेंडने सर्वांचं लक्ष वेधलं.