ASHI HI BANWA BANWI
esakal
WHAT IF DHANANJAY AND PARVATI GOT MARRIED AI VIDEO: मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन सिनेमा 'अशी ही बनवाबनवी' आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. या सिनेमातील अनेक डायलॉग आजही चाहते रोजच्या जीवनात वापरत असतात. सिनेमातील धनंजय आणि पार्वती यांची जोडी तर प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. जागेचा प्रॉम्बेल आणि परशुरामची झालेली पार्वती हे सगळं काही प्रेक्षकांच्या आजही जसंच्या तसं लक्षात आहे. दरम्यान अशातच आता धनंजय आणि पार्वती यांचा एक AI व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.