
Marathi Entertainment News : अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुशांत रे यांची मुख्य भूमिका असलेला अशीही बनवाबनवी सिनेमा कुणीही मराठी माणूस विसरू शकत नाही. अनेकजण या सिनेमाच्या रिमेकची वाट पाहत आहेत पण या सिनेमाचा रिमेक बानू शकत नाही हे सिनेमाच्या टीमने आधीच स्पष्ट केलं आहे. सिनेमाचा रिमेक बनत नसला तरीही सिनेमाच्या टायटलचा रिमेक बनून नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.