
एक बहुरंगी, बहुढंगी कलाकार म्हणून ओळख असलेले महाराष्ट्र भूषण अशोक सराफ बऱ्याच काळानंतर टेलिव्हिजन माध्यमात परत काम करताना दिसत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील 'अशोक मा. मा.' या मालिकेत अशोक सराफ मुख्य भूमिकेत झळकत आहेत. 'छोटी बडी बाते', 'हम पाँच' सारख्या मालिकांमधून अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'हम पाँच' मालिकेतील त्यांची भूमिका तर प्रचंड लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर आता 'अशोक मा. मा.' या मालिकेतून अशोक मामांच्या अभिनयाच्या विविध छटा पाहायला मिळत आहेत.