प्रेम असावं तर असं! शूटिंगपूर्वी अशोक सराफ ४ दिवस रुग्णालयात, निवेदिता ताईंनी काय केलं? संकर्षणने सांगितला खास किस्सा

ASHOK SARAF APOLOGISES FOR NIVED​​ITA SARAF'S ABSENCE AT AADI ANANT PREMIERE: आदि अनंत सिनेमाच्या प्रीमियरला निवेदिता सराफ अनुपस्थित राहिल्या. अशोक सराफ यांनी त्यामागचं कारण सांगत माफी मागितली. संकर्षण कऱ्हाडे यांनी अशोक सराफ यांच्या आजारपणात निवेदिता ताईंनी घेतलेल्या काळजीचा किस्सा सांगितला.
ASHOK SARAF AND NIVEDITA SARAF

ASHOK SARAF AND NIVEDITA SARAF

esakal

Updated on: 

ASHOK SARAF WAS HOSPITALISED FOUR DAYS BEFORE AADI ANANT SHOOTING: अभिनेते अशोक सराफ यांचा 'आदि अनंत' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान नुकताच या सिनेमाचा प्रिमियर सोहळा पार पडला. यावेळी अशोकमामांसह संकर्षण कऱ्हाडे आणि इतर कलाकार सुद्धा उपस्थित होते. परंतु निवेदिता सराफ या कार्यक्रमाला अनुपस्थित होत्या. अशोक सराफ यांनी निवेदिता ताईच्या न येण्याचं कारणही सांगितलं. त्याच वेळी संकर्षणने सगळ्यासमोर दोघांच्या प्रेमाचं आणि निवेदिता ताईंच्या काळजी घेणाऱ्या स्वभावाचं कौतूक करत एक किस्सा शेअर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com