Nivedita Saraf Viral Post: महाराष्ट्रभूषण जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अशोक सराफ यांनी माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा एकमेव क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान अशोक सराफ यांनी मालिका, चित्रपट, नाटक यामध्ये आपल्या अभिनायाची छाप पाडली.