ASHOK SARAF VIRAL VIDEO
Esakal
NIVEDITA SARAF PAITHANI SAREE VIRAL VIDEO: अभिनेता अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील आवडतं जोडपं आहे. दोघांनीही मराठी सिनेसृष्टीत अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. निवेदिता सराफ या घर आणि करिअर दोन्ही उत्तम रित्या सांभाळतात. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये निवेदिता सराफ यांना साडीत पाहून अशोकमामांनी हटके रिअॅक्शन दिलीय.